ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.

आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.

आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.

Article image


राज्य सरकार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता. 


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची दशावतार कलावंत बहुउद्देशीय संघ स्थापनेनंतर घेतलेली भेट 'सौजन्यासह सहकार्यकारक' ठरल्याचे स्पष्टीकरण. 


मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंत यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्या जाणून घेत आमच्या मागण्या तळमळीने व ठामपणे अधिवेशनात मांडल्या आणि आम्हाला खऱ्या अर्थाने शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे. याबाबत राज्य सरकार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमचे आमदार निलेश राणे आणि आम्हाला सहकार्य करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच सर्वांचे आभार अशी कृतज्ञता, 'दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघ सिंधुदुर्ग'चे मालवण अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, सल्लागार सुधीर तांडेल व उपस्थित सर्व कलावंत यांनी व्यक्त केल्या. दशावतार लोककलेच्या अनुदानात दुप्पट वाढ झाल्याच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, 'दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघ सिंधुदुर्ग, शाखा मालवण' च्या कलावंतांनी शासकीय विश्रामगृह मालवण येथे एकत्र येत त्यांची कृतज्ञतापूर्वक प्रतिक्रिया दिली. यावेळी दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग मालवण तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, सल्लागार सुधीर तांडेल, चंद्रकांत खोत, सचिव विनायक येरागी, सहसचिव विनोद परब, सदस्य बापू घाडीगावकर, योगेश खोत, पवन वालावलकर, दिलीप सुतार, रवींद्र कोळंबकर, अर्जुन खोबरेकर, भास्कर मुसळे, यशवंत मांजरेकर, गिरधर गावकर, उमेश तुळसकर, महेश तांडेल, पांडुरंग भालेकर, विलास वालावलकर, दिलीप कासवकर, अनिकेत गुळेकर उपस्थित होते.


यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, गेली कित्येक वर्षे शासकीय योजना, सरकारच्या सहकार्य यांपासून वंचित असलेल्या दशावतार कलेला आता सुगीचे दिवस येत आहेत. २०२० या वर्षात आम्ही 'सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार कलावंत बहुउद्देशीय संघ' स्थापन केला. आमचा आवाज शासन दरबारी पोचवणे, कलाकारांची नोंद शासनाकडे होऊन त्यांना मदत मिळावी अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या. आम्ही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली आमच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांच्याशी तुमची भेट घडवून देत त्यांच्या मार्फत तुमचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे आमची आमदार निलेश राणे यांच्या सोबत भेट झाली. दशावतार कलावंत यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. शासन दरबारी आमच्या मागण्या ठामपणे मांडल्या आणि आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय दिला असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.


यावेळी, दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग सदस्य तथा मालवण संघटना सल्लागार सुधीर तांडेल यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नव्हता मात्र आमदार निलेश राणे यांनी आमच्या मागण्याना शासन दरबारी वाचा फोडली. आम्हाला न्याय मिळवून दिला. आमचा दशावतार कलाकार आजपर्यंत सगळीकडे ज्या तळमळने व्यथा मांडत होता त्याच प्रमाणे आमच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे आमच्या व्यथा, आमचे दुःख जाणून त्या मांडण्याचे आणि आम्हाला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे काम आमदार निलेश राणे यांनी केले. राज्य शासनाने याची दखल घेत आमचे मानधन वाढवणे, ओळखपत्र देणे, अन्य सुविधा याबाबत घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली. 


याबाबत राज्य सरकार, मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच हा मुद्दा उचलून धरलेले पत्रकार बांधव आणि यासंदर्भात सहकार्य केलेल्या सर्वांचे दशावतार कलाकार संघटना सल्लागार सुधीर तांडेल व उपस्थित सर्व कलावंत यांनी आभार मानले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स