ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

Article image


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा.


ब्यूरो न्यूज : मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला तालुका समन्वयकपदी पूजा करलकर, तालुका सह समन्वयकपदी माधुरी जावकर, उपतालुका संघटकपदी रश्मी परुळेकर, शहर संघटकपदी राधिका मोंडकर, मालवण उपशहर संघटकपदी गौरी मयेकर, योगिता गावकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपूटे यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


पक्षसंघटना अधिक बळकट करणे, महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे, जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात पक्षवाढ, संघटन मजबुती, जनसेवा, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.


      

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितिन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, उमेश चव्हाण, तृप्ती मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, योगेंद्र गावकर, निलेश दुदवडकर, रवी तळाशीलकर, रवी मिटकर, अन्वय प्रभू, राका रोगे, ॲड. सुमित जाधव, सुशील तारी, बंड्या सरमळकर, गणपत आडिवरेकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, राजा शंकरदास, मनोज मोंडकर, किशोर गावकर, पॉली गिरकर, किरण चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, वासुदेव गावकर, सुप्रिया मडये, सुरेश मडये उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स