ताज्या बातम्या
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम. शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न. 

Article image

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार,४ जुलै २०२६ रोजी कणकवली पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार पाल्यांना भेटवस्तू, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 


यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, उपाध्यक्ष संतोष राऊळ, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, अशोक करंबेळकर, खजिनदार रोशन तांबे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, रमेश जोगळे, सुधीर राणे, विरेंद्र चिंदरकर, भाई चव्हाण, उपाध्यक्ष नंदू कोरगावकर, नितीन कदम, उमेश बुचडे , सचिन राणे, सहसचिव दर्शन सावंत, योगेश गोडवे, राजन चव्हाण , विनय सावंत, रंजिता तहसिलदार, उत्तम सावंत, संजय बाणे, हेमंत वारंग, मिलींद डोंगरे, किरण खाजनवाडकर, भास्कर रासम, संजय पेटकर, मंगेश साळस्कर, सुधीर जोशी, रमाकांत बाणे तसेच कणकवली तालुक्यातील पत्रकार व पत्रकारांचे पाल्य उपस्थित होते.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी सांगितले की, पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी, असे प्रतिपादन श्री. उमेश तोरसकर यांनी केले.


पुढे बोलताना उमेश तोरसकर म्हणाले, आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. वाचनामुळे समाजाचे आकलन वाढते. तसेच, केवळ नोकरीच्या मागे न धावता व्यवसायातही उतरले पाहिजे. नोकरीपेक्षा व्यवसायात आर्थिक समृद्धी जलद गतीने मिळते, त्यामुळे मराठी मुलांनी उद्योग - व्यवसायात नाव कमवावे. तसेच बदलत्या पत्रकारितेत काम करताना कणकवली तालुका पत्रकार संघ नेहमीच जिल्हा संघात अध्यक्ष भगवान लोके यांच्या सातत्यपूर्वक उपक्रमामुळे अग्रेसर आहे. पत्रकार संघाने नेहमीच चांगले उपक्रम राबविले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 


गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा अकॅडमी उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी आणि सिंधुदुर्गातच स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. मोठ्या शहरांमधील अकॅडमीमध्ये ज्या दर्जेदार पद्धतीचे शिक्षण दिले जाते, तेच शिक्षण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात छोटी नोकरी पकडून स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तम यश संपादन करावे. आजच्या डिजिटल युगात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी 'एआय' चा सुयोग्य आणि सकारात्मक वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे,असे आवाहनही त्यांनी केले. 


यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष भगवान लोके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अजित सावंत यांनी केले. उमेश बुचडे यांनी आभार प्रदर्शन केले.


छायाचित्र सौजन्य : प्रथमेश जाधव ( कणकवली ब्यूरो )

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

लोकप्रिय टॅग्स