ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश.

आमदार निलेश राणे यांचे वराड  येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश.

Article image

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, विविध पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची उपस्थिती.



मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वराड तलाव परिसराची पाहणी केली. त्यांनी तलावाची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर तलावातील गाळ उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह आवश्यक त्या दुरुस्तीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची पहाणी दरम्यान उपस्थिती होती.


वराड तलाव परिसराची पाहणी करताना तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गाळ साचल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी गळती व अन्य कारणाणी उपलब्ध क्षमतेचा पूर्णपणे वापर होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात गाळ उपसा, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक उपाययोजना करून तलावाची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या तसेच तालुक्यातील उपलब्ध जलस्रोतांचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Article image

या पाहणीवेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 201
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 528

लोकप्रिय टॅग्स