ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. 


मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत १४७ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.


जिल्ह्यातील या रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत ९६ उद्योजक व कंपन्यांनी १ हजार ८४९ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ८ कंपन्यांमार्फत १२८ रिक्तपदांसाठी, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात १५ कंपन्यांमार्फत ३१९ रिक्तपदांसाठी, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे ९ कंपन्यांमार्फत २०५ रिक्तपदांसाठी, वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत ६० रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.


सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ११ कंपन्यांमार्फत ३७८ रिक्तपदांसाठी, कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ८ कंपन्यांमार्फत ८६ रिक्तपदांसाठी, कणकवली येथील एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ६ कंपन्यांमार्फत १३३ रिक्तपदांसाठी, कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा (डिगस) येथील श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालयात ३ कंपन्यांमार्फत ३३ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत १४७ रिक्तपदांसाठी, देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात १० कंपन्यांमार्फत १२४ रिक्तपदांसाठी, वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्रात ७ कंपन्यांमार्फत २२४ रिक्तपदांसाठी, तर सावंतवाडी येथील बी.टी.आर.आय. येथे ३ कंपन्यांमार्फत १२ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.


जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग अमिन इ. तडवी यांनी केले आहे.


रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यक्रमस्थळी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ आहे. तसेच कार्यालयाच्या ‘sindhudurgrojgar’ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स