ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. 

Article image

Article image

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते भूमीपूजन.


२०१२ सालच्या 'विशेष' आठवणीला उजाळा.

Article image


मालवण | प्रतिनिधी : चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या चिवला बीच निलरत्न बंगला ते कुरण पर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर २०२५ - २०२६ अंतर्गत सुमारे ५० लाख निधीतून हे काम मंजूर करण्यात आले. असे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच स्थानिक नागरिक यांनी आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, दर्शना कासवकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेवक ललित चव्हाण, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, किसन मांजरेकर, उद्योजक मोहन वराडकर, माजी नगरसेवक व उद्योजक जॉन नरोना, उद्योजक परशुराम पाटकर, निकीत वराडकर, प्रसन्न मयेकर यांसह स्थानिक नागरिक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


चिवला बीच येथे संपूर्ण मार्गांवर असलेले आकर्षक पथदीप अनेक ठिकाणी बंद आहेत. हे पथदीप बसवून परिसर झळाळून निघणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर २०२५ - २०२६ अंतर्गत सुमारे १० लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले अशी माहिती मिळत आहे.



चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा रस्ता नादुरुस्त झाला होता. आमदार निलेश राणे यांनी प्राधान्यक्रमाने हे काम मंजूर करून निधी उपलब्ध करून घेतला. याबाबत आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा यांचे स्थानिक नागरिक पर्यटन व्यावसायिक यांच्या वतीने प्रसन्न मयेकर यांनी आभार मानले.


चिवला बीच येथील पर्यटन वाढीत महत्वाची भूमिका बजावणारा येथील बंधारा माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार खासदार नारायण राणे यांनी २०१२ साली मंजूर केला होता. त्यावेळी भूमिपूजन सोहळ्यात तत्कालीन नगरसेविका ममता वराडकर यांनी श्रीफळ वाढवले होते. आता येथील रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन होतं असताना आमदार निलेश राणे यांनी श्रीफळ वाढवण्याचा मान विद्यमान नगराध्यक्षा ममता वराडकर यांना दिला आणि या निमित्ताने बंधारा भूमिपूजन आठवणीतील एका समान धाग्याचा विशेष उजाळा मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 528

लोकप्रिय टॅग्स