आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर यांची उपस्थिती.
ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडिया च्या महाराष्ट्र राज्यातील ३६ प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्ते यांची आँनलाईन बैठक मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ ला संपन्न झाली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी विशेष संबोधन व सूचना केल्या आणि सध्या सुरू असलेल्या विभागीय केडर कॅम्प विषयी माहिती घेऊन संबंधित जिल्हा अध्यक्ष व कार्यकारिणींचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले. व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर यांची या बैठकीला उपस्थिती होती आणि त्यांनी याबाबत विशेष माहिती दिली आहे.
या ऑनलाईन बैठकीत, मुंबई येथे ३६ जिल्ह्यातील ३६ प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ते यांचा केडर कॅम्प घेण्यासाठी निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी बोलतांना संदीप काळे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्ते यांना सुद्धा समान अधिकार दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडिया मध्ये जास्तीत जास्त पत्रकारांना सामिल करणे हे कार्य सुद्धा प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्ते करीत असतात असे संदीप काळे यांनी स्पष्ट केले.
लवकरच ३६ जिल्ह्यातील ३६ प्रमुख यांचा केडर कॅम्प आयोजनाची घोषणा करण्यात येणार असे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी सांगितले. या झालेल्या आँनलाईन बैठकीत नागपूर विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, महाराष्ट्र कार्यकारिणीचे बापुराव पाटील आणि ३६ जिल्ह्यातील ३६ प्रसिद्धी प्रमुख - प्रवक्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)