सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान.
सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान.
मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपअभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता सूरज गिरी, शुभम दुडये व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समाधान खैरनार या सर्वांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आला.
अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असताना विविध शासकीय बांधकामे, रस्ते व पूल तसेच मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ९३ फूट उंचीचा पुतळा हे संवेदनशील काम व महाराष्ट्रातील नदीवर पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे येथे बांधण्यात आला आहे. वरील दोन्ही कामे जबाबदारीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यात योगदान दिले. सर्व कामांची गुणवत्ता, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, तांत्रिक बाबींची काटेकोर अंमलबजावणी तसेच शासकीय कामकाजातील जबाबदारीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले. हा पुरस्कार प्रेरणादायी असून, यापुढेही सार्वजनिक हिताची कामे अधिक गुणवत्तेने व प्रामाणिकपणे करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशा भावना कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपअभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता सूरज गिरी, शुभम दुडये व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समाधान खैरनार यांनी व्यक्त केल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)