मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न.
मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न.
नागरिक, स्वयंसेवक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग.
मालवण | प्रतिनिधी : स्वच्छता ही सेवा, सेवा हाच संकल्प आणि कांदळवन संवर्धन हीच पर्यावरणाची काळजी अशा तत्वांनी 'स्वच्छ मालवण - सुंदर मालवण - हरित मालवण' चा उद्देश व संकल्पना मालवण नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहे. मालवण नगरपरिषदेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी महास्वच्छता अभियानांतर्गत मालवण शहरातील विविध परिसरांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानामध्ये रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक परिसरातील कचरा हटवत झाडी - झुडपांमधील कचरा साफ केला गेला. दरम्यान कांदळवन परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा हटवण्यात आला. या मोहिमेत नागरिक, स्वयंसेवक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
यावेळी पर्यावरण संवर्धनाबाबत अशा विविध उपक्रमांद्वारे स्वच्छता राखता येऊ शकते असे स्पष्ट करत 'कांदळवन वाचवा, पर्यावरण जपा' असा संदेश देण्यात आला. कांदळवन परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि किनारी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे सहभागींच्या वतिने आवर्जून सांगण्यात आले. संकलित कचरा पर्यावरण योग्य पद्धतीने वाहून नेल्याची माहिती मिळत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)