ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दांडी येथे जनजागृती अभियान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दांडी येथे जनजागृती अभियान.

मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दांडी येथे जनजागृती अभियान.

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दांडी येथे पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध आरोग्यविषयक सूचना देताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच हिवताप व हत्तीरोग या आजारांविषयी माहिती देण्यात आली.


मालवण ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत व क्षेत्र कर्मचारी आर. व्ही. साखरे यांनी हिवताप जनजागृती अभियानांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती केली. आठवड्यातून मंगळवार हा 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा, सर्व भांडी घासून-पुसून उपडी ठेवून कोरडी करावीत, पाणी उकळून व गाळून प्यावे, ताजे अन्नपदार्थ खावेत, मच्छरांपासून सुरक्षित राहण्यासाठी शौचालयाच्या पाईपला जाळी लावावी तसेच डबके व रिकाम्या भांड्यांमध्ये पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले. यासह विविध आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.


यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा चव्हाण, सहकारी शिक्षिका श्रीमती बागवे, श्रीमती राणे, श्रीमती चौकेकर तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती मोरजकर उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स