ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांना १०७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन.

श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांना १०७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन.

श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांना १०७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन. 

Article image


एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धन संदेशासह उत्स्फूर्त सहभाग.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्वर्गीय एच. डी. गावकर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.


यावेळी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी सांगितले की, बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांनी ग्रामीण भागात शिक्षणसंस्थांची उभारणी केली. शिक्षणप्रेमी व पर्यावरणप्रेमीही होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वृक्षारोपण करून जयंती साजरी केली जाते. निसर्गावर प्रेम करण्याचा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 


यावेळी सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डगरे यांनी, एच. डी. गावकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचा आदर्श समाजाने घ्यावा आणि समाजासाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे सांगितले.


‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात दुर्वा झाड, मोहित अंधारी, कौस्तुभ पेडणेकर, रचना गोसावी, दिवाकर गोसावी आणि तन्मय देऊलकर या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले. या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


यावेळी शिक्षक संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर, यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी, शालेय पंतप्रधान वेद कुबल, उपपंतप्रधान वेदिका लुडबे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनाथ फणसेकर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण कुबल यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स