सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आलेल्या कोल्हापूरच्या नाभिक बांधवांचे श्रावण येथे स्वागत.
सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आलेल्या कोल्हापूरच्या नाभिक बांधवांचे श्रावण येथे स्वागत.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गावात, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील नाभिक बांधवांचे, सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने श्रावण येथे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कोकण विभागीय प्रसिद्धीप्रमुख गणेश चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी, सिंधुदुर्गातील भजनी बुवा संजय चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागपतर सदिच्छा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल न्हावेलकर, मालवण तालुकाध्यक्ष ॲड. भाऊ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण, आनंद आचरेकर, अंकुश चव्हाण, निलेश चव्हाण या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत स्वागत केले.
आपण सर्व नाभिक बांधव एकाच कुटुंबातील असून एकमेकांना सहकार्य मिळावे अशा उद्देशाने गणेश चव्हाण यांनी या दौऱ्याचा पाठपुरावा करून कोल्हापूरच्या पथकाला श्रावण येथे निमंत्रित केले व त्यांचा सन्मान केला अशी माहिती गणेश चव्हाण यांनी दिली आहे. त्यांच्या या पुढाकाराचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी दूरध्वनीद्वारे आभार व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद, त्वचा व केश संरक्षणतज्ज्ञ डॉ. विवेक सूर्यवंशी, नाभिक युवक संघटना कोल्हापूर अध्यक्ष मोहन चव्हाण, नाभिक समाज बोर्डिंग कोल्हापूर उपाध्यक्ष दिपक खराडे, नाभिक वधूवर सूचक मंडळ अध्यक्ष विजय कोरे, नाभिक पतसंस्था कोल्हापूर अध्यक्ष सुनिल टिपुगडे, नाभिक समाज बोर्डिंग ट्रस्टी ॲड. डि. एन. जाधव, युवक संघटना सदस्य विजय मांडरेकर, कोल्हापूर शहराध्यक्ष विकी सुर्यवंशी, सलून दुकान मालक संघटना कोल्हापूर संचालक राहुल काशीद, संचालक सोमण गवळी, बोर्डिंग कोल्हापूर ट्रस्टी दिलीप टिपुगडे, संदीप टिपुगडे, तानाजी मर्दाने, उदय माने, सलून दुकान मालक संघटना कोल्हापूर सचिव राहुल टिपुगडे, नाभिक पतसंस्था कोल्हापूर संचालक दीपक माने, नाभिक युवक संघटना खजानीस लक्ष्मण फुलपगारे, विश्वास गंगाधर, पतसंस्था वसुली कमिटी सदस्य उदय गवळी, माजी सरपंच सतीश जाधव, अमोल गवळी, डी. डी. शिंदे, इंद्रजित जगताप, बाळासाहेब गवळी, महेश जाधव, मालवण नाभिक संघटना माजी अध्यक्ष हरेश चव्हाण, जगदीश चव्हाण, संजय चव्हाण तसेच नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)