ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.

अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित एप्रिल - मे २०२५-२६ सत्रातील शास्त्रीय संगीत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. गायन, हार्मोनियम ( संवादिनी) व तबला परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी तसेच विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. 


भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेतील गायन प्रारंभिक परीक्षेत श्रीनिधी तारी, आरोही शिंदे, गार्गी मडये आणि विजय सारंग या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. योगिता चव्हाण, वीर कांबळी आणि स्वरा कांदळगावकर या विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली.


गायन प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हायस्कूलच्या रिद्धी मडये, श्रेया शिंदे आणि रेणुका चव्हाण या विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर वैष्णवी आंबेरकर, खुशी सावंत, पूर्वा चोपडेकर, नागेंद्र तारी आणि कृपा साळगावकर या विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली.


हार्मोनियम प्रवेशिका प्रथम परीक्षेत यशश्री मोरजकर हिने प्रथम श्रेणी, तबला प्रारंभिक परीक्षेत विघ्नेश वालावलकर याने विशेष योग्यता श्रेणी तसेच तबला प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हिमांशू मालवणकर याने प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले.


या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक विजय बोवलेकर आणि मंगेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच मार्गदर्शक शिक्षक, सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स