ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
साने गुरूजींच्या 'वारा वदे कानांमध्ये' सारख्या गीत रचना बालपिढीला अधिक समृद्ध, सुसंस्कृत व प्रेमळ करतील...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साने गुरूजींच्या 'वारा वदे कानांमध्ये' सारख्या गीत रचना बालपिढीला अधिक समृद्ध, सुसंस्कृत व प्रेमळ करतील...!

साने गुरूजींच्या 'वारा वदे कानामध्ये' सारख्या गीत रचना बालपिढीला अधिक समृद्ध, सुसंस्कृत व प्रेमळ करतील...!


साने गुरूजींच्या पुण्यतिथीनिमित्त मालवणच्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित सानेगुरुजी वाचन मंदिरच्या प्रमुख ग्रंथपाल ॠतुजा केळकर यांची आदरांजली. 


विशेष : साने गुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने यांची आज ११ जून रोजी पुण्यतिथी. मातृप्रेम, संवेदनशीलता आणि मूल्यांची शिकवण देणारे साने गुरुजी हे एक 'अत्यावश्यक सर्वांगीण असे शैक्षणिक तत्व' मानले जातात. त्यांनी रचलेले 'वारा वदे कानांमध्ये' हे गीत आजच्या बालपिढीला संस्कार आणि प्रेमाचा मार्ग दाखवण्यासाठी अत्यंत गरजेचे ठरते.


साने गुरुजी म्हणजेच अथांग संवेदनशीलता, असीम मातृप्रेम आणि मूल्यांची जपणूक करणारा संस्कार. गुरुजींनी आयुष्यभर लहान मुलांवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी लिहिलेले 'श्यामची आई' हे पुस्तक आजही घराघरात वाचले जाते. डिजिटल आणि वेगवान युगात देखिल साने गुरुजींच्या विचारांचे आणि त्यांनी रचलेल्या साहित्याचे मूल्य तसूभरही कमी झालेले नाही. गुरुजींनी रचलेल्या अनेक अजरामर गीतांपैकी एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे म्हणजे 'वारा वदे कानांमध्ये'.

या गाण्यात साने गुरुजींनी निसर्गाच्या माध्यमातून मानवी जीवनाचे आणि कर्तव्याचे तत्त्वज्ञान मांडले आहे. वारा माणसाच्या कानात येऊन सांगतोय की, निसर्गात जसे सगळे एकत्र राहतात, झाडे - वेली जशा आनंदाने डोलतात, तसेच माणसानेही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. द्वेष, मत्सर विसरून सर्वांनी एकत्र यावे, हाच संदेश हा वारा आपल्याला देत असतो. 'वारा वदे कानांमध्ये' हे गीत मुलांना निसर्गाशी जोडते आणि त्यांच्यात शाश्वत नैसर्गीत गतीसह संवेदनशीलता निर्माण होते असा अनेकांचा अनुभव आहे 

 

मुलांना निसर्गाचे महत्त्व कळावे, झाडे, फुले आणि वारा यांच्याशी त्यांचे नाते जोडले जावे, यासाठी हे गीत मार्गदर्शक ठरते सोबतच मुलांच्या मनात नकळतपणे राग किंवा तुलना करण्याच्या भावनेला सृजनशीलतेचा प्रवाह गवसू शकतो. हे गीत माणसाने माणसाशी प्रेमाने वागण्याचा संदेश देताना निसर्गाच्या कुशीत मिळणारा आनंद आणि शब्दांमधील आर्जव श्रवणकर्त्याच्या मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतो. साने गुरूजींच्या 'कुणा ना तुच्छ लेखावे,' शिकवणीतून जगाला 'उचितपणे' प्रेम द्यायची वृत्ती विकसित होऊ शकते असेही अनेक सामाजिक तज्ञ आवर्जून सांगतात.

Article image


साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त, मालवणच्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर प्रमुख ग्रंथपाल ॠतुजा केळकर यांनी आदरांजली वाहताना एक दुर्मिळ छायाचित्र सामाईक करत म्हणलंय की, साने गुरुजींनी 'मुले ही देवाघरची फुले' हा नऊ अक्षरी मंत्र आपल्या आयुष्याचे जीवन मानले. ग्रंथपाल ॠतुजा केळकर यांनी साने गुरुजींना वारा वदे कानामध्ये हे गीत व अशा रचना आणि विचार आजच्या लहान मुलांपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक आदरांजली ठरावी अशी आशा व्यक्त केली आहे. शाळा, घरे आणि बालसंस्कार केंद्रांमध्ये 'वारा वदे कानांमध्ये' सारखी गाणी केवळ गाऊन न थांबता, त्यातील अर्थ मुलांच्या मनावर रुजवायला हवा तसेच साने गुरुजींच्या विचारांची मशाल अशीच तेवत ठेवून आपण आपली बालपिढी अधिक समृद्ध, सुसंस्कृत आणि प्रेमळ बनवुया असा मानवतेचा आग्रह देखिल ॠतुजा केळकर यांनी त्यांच्या छोटेखानी आदरांजलीपर लेखनाद्वारे मांडला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स