वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.
वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.
विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांची प्रमुख उपस्थिती.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. माजी खासदार, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक, ज्येष्ठ नेते माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व महिला जिल्हाप्रमुख सौ. नीलम पालव यांनी संबोधनाद्वारे विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह ग्रा. पं. सदस्या शोभना जाधव, सिद्धी सुर्वे, सुप्रिया जाधव, रुपेश पांचाळ, माजी उपसरपंच मोहन हडशी, ग्रामस्थ मयूर सुर्वे, मनोज सुर्वे, भरत खानविलकर, सागर सुर्वे, रवीउदय पांचाळ, जयेश पांचाळ, जयवंत पांचाळ, अनंत कांबळे, सुधाकर पांचाळ, परेश पांचाळ, नितीन पांचाळ, गणेश पांचाळ, रत्नकांत सुर्वे, विश्वजित खानविलकर, विश्वनाथ पांचाळ,चंद्रकांत खानविलकर, अनंत निंबाळकर,महेश पांचाळ, गौरव सुर्वे, गुरुनाथ हडशी, भावेश हडशी,गुणाजी सुर्वे, अक्षय पांचाळ, समीर पांचाळ, अक्षय कुळये यांसह शेकडो नेर्ले ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा आणि मशाल हाती घेतली आहे.
याप्रसंगी वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक गुलझार काझी, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शाखाप्रमुख यशवंत खानविलकर, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव, सुरेश पांचाळ, संजना गावडे, भरत खानविलकर, वसंत खानविलकर, मयूर सुर्वे, रमाकांत मोरे, बाळा राऊत, भाऊ वळंजू, प्रसाद नारकर, यशवंत गवाणकर, जितेंद्र तळेकर, सूर्यकांत परब, रोहित पावसकर, नाना जैतापकर, सुरेश पांचाळ, ओमकार इस्वलकर, रिहाना काझी, नलिनी पाटील आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)