रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
मुख्याध्यापक फादर अँथनी डिसोजा यांचे विद्यार्थ्यांना दररोज काही वेळ योगासाठी राखून ठेवण्याचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर अँथनी डिसोजा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रार्थना व योग महती समजावून करण्यात आला.
योग शिक्षिका दीपा वणकुद्रे यांच्यासह सहकारी योग साधक नझिरा शेख़, पूजा वणकुद्रे यांच्या प्रात्यक्षिक मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
प्रशालेचे मुख्याध्यापक अँथनी डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना दररोज काही वेळ योगासाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 'योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे,' हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि निरोगी जीवनशैलीची प्रेरणा देणारा ठरला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)