ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आडवलीत स्वामी भक्त आणि सेवेकरी यांचे रस्त्याच्या  डागडुजीसाठी श्रमदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आडवलीत स्वामी भक्त आणि सेवेकरी यांचे रस्त्याच्या डागडुजीसाठी श्रमदान.

आडवलीत स्वामी भक्त आणि सेवेकरी यांचे रस्त्याच्या डागडुजीसाठी श्रमदान.

Article image

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आडवली येथील अष्टगणकोट समर्थगड येथे स्वामी भक्त आणि सेवेकरी यांच्या श्रमदानातून श्री स्वामी समर्थ मठाकडे येणाऱ्या सुमारे ३ किलोमीटर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. सेवेच्या भावनेतून भक्तांनी एकत्र येत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे योग्य बनवला आहे. हा रस्ता पक्का डांबरी करावा अशी मागणी स्वामी भक्तांमधून होत आहे. 

Article image

​अष्टगणकोट समर्थगड येथील रस्ता अत्यंत खराब झाला होता. खड्डे आणि दुरवस्थेमुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी मठाचे सेवेकरी आणि स्वामी भक्तांनी पुढाकार घेतला. शेकडो स्वामी भक्तांनी आणि सेवेकऱ्यांनी हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदानाला सुरुवात केली. रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडीझुडपे छाटणे आणि रस्ता समपातळीत आणण्याचे काम करण्यात आले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा ३ किमी रस्ता पूर्ण झाला आहे.

Article image


​या श्रमदानामुळे मठाकडे येणारा मार्ग सुकर झाला असून, वाहतुकीची मोठी कोंडी आणि अडथळे दूर झाले आहेत. मठाचे अध्यक्ष सुनिल घाडीगावकर यांनी याबाबत श्रमदानातील सहभागींची प्रशंसा केली.


यावेळी माजी सभापती राजू परुळेकर, रमेश घाडीगावकर, सोनू सावंत, यशवंत कुबल, सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांनी श्रमदान केले. सुनिल घाडीगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स