आमदार निलेश राणे यांना मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचे वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत निवेदन.
आमदार निलेश राणे यांना मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचे वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत निवेदन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात पर्यटकांची वाढती संख्या आणि वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मालवण नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर या समस्येवर तोडगा व उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत चर्चा केली. पर्यटन हंगामातील वाहतूक कोंडी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने तसेच उपाययोजना दृष्टीने चर्चा करण्यात आली.
वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून नगराध्यक्षांच्या वतीने जिल्हा पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची सकारात्मक आणि तात्काळ दखल घेतली. शहरातील मुख्य प्रवेशद्वार आणि गर्दीचे केंद्र असलेल्या सकपाळ नाका, भरड नाका व मोक्याच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
आमदार निलेश राणे यांच्या गतिमान कार्यपद्धतीवर जनतेने दृढ विश्वास ठेवावा आणि मालवण शहर अधिक सुंदर व शिस्तबद्ध बनवण्यासाठी नगरपरिषदेला पूर्ण सहकार्य करायचे आवाहन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)