ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेत ४ सप्टेंबर पर्यंत 'हयातीचे प्रमाणपत्र' सादर करायचे आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेत ४ सप्टेंबर पर्यंत 'हयातीचे प्रमाणपत्र' सादर करायचे आवाहन.

मालवणातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेत ४ सप्टेंबर पर्यंत 'हयातीचे प्रमाणपत्र' सादर करायचे आवाहन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील ज्या दिव्यांग बांधवांनी नगरपालिकेकडे आधीच नोंदणी केली आहे, परंतु अद्याप 'हयातीचे प्रमाणपत्र' सादर केलेले नाही, त्यांनी ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मालवण नगरपरिषद कार्यालयात त्यांचे प्रमाणपत्र जमा करावे. तसेच हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेल्या पात्र दिव्यांगांना शासनाच्या नियमानुसार व निश्चित टक्केवारीनुसार उदनिर्वाहासाठीचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये एनईएफटी किंवा आरटीजीएस द्वारे जमा केला जाणार आहे, अशी माहिती मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी दिली.


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या २८ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार, मालवण नगरपरिषद क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२६-२०२७ साठी दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सन २०२५-२०२६ या वर्षात नगरपालिकेकडे एकूण १२८ दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झालेली आहे. मालवण नगरपरिषद हद्दीतील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी अशी देखिल माहिती मिळत आहे. 


सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून नगरपालिकेच्या या योजनेचा आणि राखीव निधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स