ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सावंतवाडीत रक्तदात्यांचा सन्मान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीत रक्तदात्यांचा सन्मान.

सावंतवाडीत रक्तदात्यांचा सन्मान.

Article image

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी शहरातील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी १० मे २०२६ रोजी 'ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग' संस्थेने मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदात्यांचा सन्मान केला. यामध्ये गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह गोवा बांबुळी आदी रुग्णालयांमध्ये दिवसा रात्री अपरात्री जात रक्तदान करत रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणादायी मंडळींचा समावेश होता.  


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी, सामाजिक कार्यकर्ते श्री गुरू नाईक, आरपीडी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, लायन्स अध्यक्ष अमेय पई, रोटरी अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ भांबुरे, पर्यटन संस्थेचे जितू पंडित, उपाध्यक्षा मीनल सावंत आदी उपस्थित होते.

Article image

   

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे कार्याध्यक्ष व नियमित रक्तदाते महेश रेमुळकर यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून कार्याचा आढावा घेतला आणि सदरचा सन्मान सोहळा आयोजित करण्या मागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिलाग्रीस हायस्कूलच्या माजी पर्यवेक्षक मेघना राऊळ, आरपीडी हायस्कूल मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, अमेय पई, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ७८ वेळा रक्तदान करणारे सुधीर पराडकर, कोमसाप अध्यक्ष तथा संस्थेचे निमंत्रित सदस्य कवी दीपक पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रक्तदात्यांचे व संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी यांनी रक्तदात्यांचा आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती याबाबत मार्गदर्शन केले. संस्था सचिव बाबली गवंडे यांनी देखील मनोगत व्यक्त करून अलीकडेच गया येथे संस्थेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबाबत माहिती दिली व मित्र संस्थांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करून मित्रसंस्थानी अशीच सदैव साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

    

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे नियमित रक्तदाते रक्तदान करून रुग्णांचा प्राण वाचवतात, रक्तदाते करत असलेल्या अमूल्य कार्यामुळेच संस्था मोठी होते, नावलौकिक प्राप्त होतो असे कौतुक करून गेल्यावर्षी ९० रक्तदात्यांचा सामूहिक विमा उतरवला तसाच यावर्षी देखील आणखी ५०/६० नवीन रक्तदात्यांचा सामूहिक विमा उतरवणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी रक्तदान चळवळीत सहकार्य करणाऱ्या गावागावातील मित्रसंस्थांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मान्यवरांच्या मनोगतादरम्यान वर्षातून चारवेळा, तीनवेळा, दोनवेळा असे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा अमेय पई पुरस्कृत ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या नावाची टी शर्ट व ड्रायफ्रुट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रक्तदान चळवळीत मित्रसंस्था म्हणून साथ देणाऱ्या जवळपास ३३ संस्थांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वेळोवेळी संस्थेच्या समूहावर रक्तदान विषयी पोष्ट येताच तत्परतेने विविध रुग्णालयांत जाऊन रक्तदान करणाऱ्या अनेक रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


रक्तदाते सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश रेमुळकर व बाबली गवंडे यांनी केले. या दरम्यान रक्तदात्यांच्या वतीने महावितरण मधून निवृत्त झालेल्या दिनेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

   

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासार्डे कॉलेजचे प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले तर आभार दिनेश गावडे यांनी मानले. यावेळी नाना आंबेरकर, सिद्धार्थ पराडकर, श्री माणगावकर, सौ. श्रीया माणगावकर, आबा सुकी, गुंडू साटेलकर, राम वाडकर, श्री.कोरगावकर, बाळकृष्ण राणे, जयवंत गवस, वेटे , सुंदरवाडी गृपचे सदस्य, शरद शेटकर आदी रक्तदाते व संस्थेचे सदस्य व हितचिंतक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स