शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दाखल्यांचे मोफत अर्ज आणि कागदपत्रांबाबत सहकार्य व मार्गदर्शन.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दाखल्यांचे मोफत अर्ज आणि कागदपत्रांबाबत सहकार्य व मार्गदर्शन.
शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांची माहिती.
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा मालवणच्या वतीने मालवण शहर व तालुका मर्यादित 'तुमचे दाखले... आमची जबाबदारी..' मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांचे मोफत अर्ज तसेच दाखल्यांच्या कागदपत्राबाबत संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन सेवा मिळणार आहे.
याबाबत मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी आवाहन करताना सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील या उपक्रमाचा मालवण शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर (9404165209), शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी (9404827200 / 9270827200) व नगरसेवक मंदार ओरसकर (9545807300) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो अशी माहिती शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)