ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान.

योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान.

योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान.

Article image


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय योगसेवेबद्दल ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ए. डी. फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.


श्री. बांदेकर गेल्या सहा वर्षांपासून विविध गावांमध्ये जाऊन योगशिबिरे आयोजित करणे, नियमित योगवर्ग घेणे तसेच योगाभ्यासाबाबत जनजागृती करण्याचे कार्य निस्वार्थी आणि निःशुल्क पद्धतीने करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे समाजामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित झाले असून योग क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातूनही ते योगसेवा देत असल्याने त्यांना एक उत्तम योगशिक्षक म्हणून ओळख मिळाली आहे.


हा पुरस्कार वितरण सोहळा दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. मुंबईचे आयकर आयुक्त श्री. सचिन मोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त सौ. रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गोरड, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. अशोक शिंदे, तसेच अध्यक्ष अशोक गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.


या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २० योगसाधकांनीही उपस्थिती दर्शवली. श्री. बांदेकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे बांदा, सावंतवाडी, कुडाळ तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स