ताज्या बातम्या
व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.
मुणगे हायस्कूलच्या ९ विद्यार्थ्यांना दहावीत डिस्टिंक्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे हायस्कूलच्या ९ विद्यार्थ्यांना दहावीत डिस्टिंक्शन.

मुणगे हायस्कूलच्या ९ विद्यार्थ्यांना दहावीत डिस्टिंक्शन.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे संचलित श्री भगवती हायस्कूल मुणगेचा इयत्ता दहावीचा निकाल ८७.५०% लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता १०वी) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २४ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९ विद्यार्थ्यांना 'डिस्टींक्शन' मिळाले आहे. ८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, २ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर २ जण उत्तीर्ण झाले आहेत. 


श्री भगवती हायस्कूल मुणगे या प्रशालेतून मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने ९१.२०% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. सोहम प्रमोद हिर्लेकर याने ९०.८०% तर श्रावणी परेश माटवकर हिने ८७.६०% गुण मिळवत यश प्राप्त केले.


प्रशालेच्या या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स