ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
हिंदळे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदळे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

हिंदळे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

         

मसुरे | प्रतिनिधी :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, देवगड तालुक्यातल्या हिंदळे ग्रामीण वाचनालय, हिंदळे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, घटनेवर, विचारांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन हिंदळे वाचनालय येथे आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात मांडलेल्या विविध पुस्तकांचे वाचन करत विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिप्राय कथन केले. 


विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा मिळावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात व्हावेत यासाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 


यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हिंदळे भंडारवाडा शाळा विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक तसेच इतर विध्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सरपंच मकरंद शिंदे, किरण हळदणकर, मंगेश हिर्लेकर, संतोष आचरेकर, दयानंद तेली. परेश खोत, सुधीर पारकर, अब्दुलगफूर आगा, सुनिल पारकर, मनोज जाधव, अनिरुद्ध अभ्यंकर, योगेश पाटील, मंगेश मयेकर, मनोहर मोदी, वाचनालय लिपिक प्रकाश बोरकर, ग्रंथापाल सौ. मिताली हिर्लेकर, हिंदळे भंडारवाडा शाळा शिक्षिका सौ. शीतल मयेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स