श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १००%.
श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १००%.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
श्री. रेकोबा माध्यमिक विद्यालय प्रशालेतून कु. प्रज्ञा अरुण पवार हिने ४१७ गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. मानसी महादेव धुरत हिने ३४७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. पूजा अनिल परसे हिने ३४५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक श्री. संजय खोचरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)