श्रीराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्या वतीने स्वराली मुणगेकर हिचा सत्कार.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्या वतीने स्वराली मुणगेकर हिचा सत्कार.
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे गावची कन्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूणची विद्यार्थिनी कु. स्वराली संस्कृती सतिश मुणगेकर हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ९५.४० टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. कु. स्वराली मुणगेकर हिच्या या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे विश्वस्त डॉ. यतिन जाधव व पदाधिकारी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर, उपाध्यक्ष सौ. सई वरवाटकर, सचिव श्री. मल्लेश लके, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड, सदस्य श्री. कांता चिपळूणकर, सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेसाठी स्वरालीने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला होता. प्रत्येक विषयाचा नियमित सराव, वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे घवघवीत यश मिळाले आणि या उज्जवल यशामध्ये तिला शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले, असे स्वराली मुणगेकर हिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)