ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता सोहळा उत्साहात.

मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता सोहळा उत्साहात.

मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता सोहळा उत्साहात.

Article image


शिरगांव शाळा समिती चेअरमन माजी प्राचार्य विजयकुमार कदम, विद्यालयाचे मानद अधिक्षक संदीप साटम, वरिष्ठ महाविद्यालयाचे मानद अधिक्षक सुधीर साटम, शाळा समिती चेअरमन माजी प्राचार्य विजयकुमार कदम, डाॅ. राजेंद्र चव्हाण व अनेक मान्यवरांची उपस्थिती.




मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार ( आत्तार सर) ३४ वर्षे व ११ महिन्यांचा सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. शिरगांव हायस्कूल येथे त्यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालय मानद अधिक्षक संदीप साटम व मान्यवरांनी आत्तार सरांच्या दीर्घकालीन शैक्षणिक योगदानाची विशेष प्रशंसा केली. 


यावेळी संबंधित करताना शाळा समिती चेअरमन माजी प्राचार्य विजयकुमार कदम म्हणाले की, आत्तार सरांनी संगणकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली. त्यांची संशोधनाची वृत्ती खूप उच्च पातळीवर आहे. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग शिरगांव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाला. त्यांनी ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केले. ते शिक्षकीय पेशामधून जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी या संस्थेचे ते कायम अविभाज्य घटक असतील अशीही अपेक्षा शिरगांव हायस्कुल शाळा समिती चेअरमन तथा माजी प्राचार्य विजयकुमार कदम यांनी व्यक्त केली.


यावेळी, विद्यालयाचे मानद अधीक्षक संदीप साटम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे मानद अधीक्षक सुधीर साटम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिलीप पाळेकर, ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. राजेंद्र पारकर, गणेश साळगावकर, विठोबा लब्दे, चंद्रशेखर आचरेकर, पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाळके, कोळोशी हडपिड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. बी. करडे, ताजुनबी आत्तार, नाझनीन आत्तार, सलीम आत्तार, हिदायन आत्तार, राजेंद्र शेट्ये, नूतन मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, नागेश पवार आदींसह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी शमसुद्दीन आत्तार सरांच्या शिक्षकी सेवेविषयी गौरवपर मनोगत व्यक्त केले.


संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने शमशुद्दीन आत्तार सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक यांनीही त्यांना वैयक्तिक भेट वस्तू देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार सर म्हणाले की, त्यांचे वडिल आदर्श शिक्षक होते. गेली ३५ वर्षे वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या शिक्षकी पेशात काम केले. नोकरी करत असताना कधीच संसाराचा विचार केला नाही. शमसुद्दीन आत्तार यांनी त्यांच्या नोकरी दरम्यान पत्नीने दिलेल्या अमूल्य साथीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ज्या शिरगावात घडलो त्यामुळे या संस्थेचा आणि या गावाचा मी कायम ऋणी असेन असेही शमसुद्दीन आत्तार यांनी सांगितले.


सागर करडे यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती धुरी यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स