ताज्या बातम्या
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम. शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
मालवण नगरपरिषद आढावा बैठक संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषद आढावा बैठक संपन्न.

मालवण नगरपरिषद आढावा बैठक संपन्न. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपालिकेचीआढावा बैठक ५ मे २०२६ रोजी संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर , मागासवर्गीय कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह परिवहन विभाग, मालवण पोलीस मालवण पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वीज वितरण अधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच विषय समित्यांच्या सभापतींसह मान्यवर नगरसेवकांनी विविध विभागातील समस्यांबद्दल लक्ष वेधत संबंधित विभागांना त्या समस्यांच्या उपायांबद्दल सूचित केले. वाहतूक, वाहनतळ, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरील वीज दुरूस्ती संदर्भात कामे तसेच वीज मीटर जोडणी आणि विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. 


यावेळी उपस्थित संबंधित सर्व अधिकारी वर्गाने, नगराध्यक्ष ममता वराडकर व मान्यवर नगरसेवक - नगरसेविका यांनी सूचित उपायांच्या नोटीसा तथा कारवाईच्या आदेशापश्चात अंमलबजावणी विषयी आश्वस्त केले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स