ताज्या बातम्या
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम. शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाब्बास मितू.....!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शाब्बास मितू.....!

'शाब्बास मितू.....!'

Article image


माणगांवच्या कु. मिताली मनाली मिलिंद धुरी हिचा नवोदय विद्यालयात प्रवेशानंतर विविध स्तरातून अभिनंदन व सदिच्छांचा वर्षाव.


  

ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील माणगावच्या कु. मिताली मनाली मिलिंद धुरी हिने, अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या सांगेलीच्या 'जवाहर नवोदय विद्यालयात' प्रवेश प्राप्त केला आहे. तिने प्रवेश परीक्षेत ९१.२५% गुण कमावून इयत्ता ६ वी मध्ये तिचा प्रवेश निश्चित केला आहे.


कु. मिताली हिचे प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद शाळा नंबर १, माणगाव येथे झाले. पहिली ते पाचवी दरम्यान तिने विविध स्पर्धांमध्ये तिचे वर्चस्व टिकवून ठेवले होते. तिच्या आतापर्यंतच्या सर्वांगीण शैक्षणिक कालावधीत तसेच या यशात तिला तिच्या आई - वडिलांसह शिक्षक एकनाथ कुर्लेकर, ज़ियाउद्दीन ख़तीब आणि शिक्षिका सौ. संचिता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. 


कु. मिताली हिच्या या यशाबद्दल तिचे वडिल पत्रकार श्री. मिलिंद धुरी आणि आई सौ. मनाली मिलिंद धुरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. कु. मिताली व श्री. मिलिंद रामा धुरी परिवारावर अभिनंदन व सदिच्छांचा वर्षाव होत आहे. कु. मिताली हिची जिद्द व चिकाटी तसेच नेहमी पहिल्या तीन क्रमांकात राहण्याच्या सचोटीचे फळ तिला या यशाच्या रूपाने मिळाले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स