'कष्ट, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा सुंदर उत्सव...!'
'कष्ट, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा सुंदर उत्सव...!'
'AaGaaz Fashion Runway 2026' चे उद्घाटक नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रशंसोद्गार.
विविध थिम्समधून 'फ्लोरेट काॅलेज ऑफ डिझायनिंग'च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेची चुणूक.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला 'AaGaaz Fashion Runway 2026' हा भव्य आणि आकर्षक फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध थीम्समुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन, कणकवलीचे नगराध्यक्ष उद्घाटक संदेश पारकर यांच्या हस्ते झाले तर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, सुमेध नाडकर्णी, सचिन बोराटे, सार्था कदम यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, जुई मुरकर, दीपिका जाधव, रामदास विखाळे, सत्यजीत पारकर, समृद्धी पारकर, सौरभ पारकर, दिवाकर मुरकर, किशोर कदम नेहा कदम, आर्या कदम, सिध्देश महाजन, बंटी पिळणकर, संतोष पुजारे, बबली राणे, वैभव मांलडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 'Mho7'चे विलास कोरगावकर, 'GS कलेक्शन'चे सुरज रणशूर, निनाद कन्स्ट्रक्शनचे निनाद विखाळे, वोग कलेक्शनचे ओम आळवे, स्नेहा इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंटचे टिकले, विल्सन प्रॉपर्टीज, हॉटेल मालवणी गजाली यांचेही सहकार्य लाभले.
यावेळी संबोधित करताना उद्घाटक व नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी, फ्लोरेट कॉलेजसारख्या संस्थेमुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद मिळते असे सांगितले. हा फक्त फॅशन शो नसून विद्यार्थ्यांच्या कष्ट, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा सुंदर उत्सव आहे अशी प्रशंसा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा, नवे व्यासपीठ आणि उज्ज्वल भविष्य मिळते याबद्दल त्यांनी संचालिका सार्था कदम यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी विद्यामंदिर हायस्कूल मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, वामन तर्फे (मुख्याध्यापक, शिरवंडे हायस्कूल), सुमंत दळवी मुख्याधपक कनेडी हायस्कूल,दत्तात्रय केसरकर (गुरुकुल अकॅडमी), राखी अरदकर (कला शिक्षिका, टोपीवाला हायस्कूल) मंदार सुतार मुंबई यांना फ्लोरेट कॉलेजच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या शोमध्ये डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, मॉडेल असे सुमारे दिडशे कलाकार सहभागी झाले. या शोमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची 'गंजिफा' ही थीम होती. या अंतर्गत सावंतवाडीच्या पारंपरिक गंजिफा कलेला आधुनिक फॅशनची जोड देत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. काजल गावडे यांना सर्वोत्कृष्ट थीमचे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.
आर्या जळवी, श्रेया जळवी, काजल गावडे, अन्वी हर्ने, रिया परब, रासिका सातार्डेकर, साक्षी राऊळ यांची पिंगुळी गावातील पारंपरिक 'चित्रकथी' कलेवर आधारित थीम विशेष आकर्षण ठरली. सत्ययुग ते कलियुग या संकल्पनांवर आधारित युग थीमचे सादरीकरण झाले. यातील निपूर्णा आडकर सर्वोत्कृष्ट डिझायनरचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 'अरण्य' ह्या निसर्ग आणि जंगलावर आधारित थीमवर सादरीकरण केले. सेजल परब यांना सर्वोत्कृष्ट डिझायनरचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी थीम
'आर्किटेक्चर' थीमवर शीश महाल, लाल किल्ला यांसारख्या वास्तूंवर आधारित डिझाईन्सचे सादरीकरण केले.
मॉडेल पुरस्कार पुरस्कारात सानिका दळवी सर्वोत्कृष्ट फीमेल माॅडेल तर वेदांत हडकर सर्वोत्कृष्ट मेल माॅडेल ठरले. सर्वोत्कृष्ट बाल तथा सर्वोत्कृष्ट कीडस् माॅडेल म्हणून कु. आद्या रासम मानकरी ठरली.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून, मुंबईतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सागर कजरेकर, माधवी शिवापुरकर, राखी अरदकर, नरेंद्र राणे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात फॅशन विभागातील प्राध्यापक श्रुती सावंत, अमेय हिर्लेकर, भाग्यश्री कुंभार, प्रियांका शिरोडकर यांचे विशेष योगदान लाभले. ॲडमीन विभागात शैलेश कदम, सायली डामरी तसेच सम्मेद जैन, चैतन्य पवार व चिन्मय सरमळकर, अमर पवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते निलेश पवार यांनी केले. प्रास्ताविक किशोर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा कदम यांनी केले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...
श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण.