चमकण्यासाठी नव्हे तर सातत्य, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवा..!
चमकण्यासाठी नव्हे तर सातत्य, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवा..!
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे सिनेमा कार्यशाळेच्या समारोपाला 'तज्ञांचा संदेश.'
कलाप्रेमी बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि ‘सिने कथा कीर्तन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ सत्रांच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथील दादासाहेब शिखरे सभागृहात, कलाप्रेमी बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त चाललेल्या, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि ‘सिने कथा कीर्तन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिनेमा कार्यशाळेचा १२ एप्रिल २०२६ रोजी समारोप झाला. १८ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या कार्यशाळेतील एकूण १२ सत्रे संपन्न झाली.
१२ एप्रिल रोजी आयोजित समारोप समारंभाचा शुभारंभ, साने गुरूजींच्या 'खरा तो एकचि धर्म' या प्रार्थनेने झाली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. सौ. ज्योती बुवा तोरसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री किशोर शिरोडकर यांच्या हस्ते ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ सिनेमाचे लेखक व निर्माते तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री अमरजीत आमले यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शक मनोगत व्यक्त करताना श्री. आमले यांनी सिनेमा आणि नाटक ही केवळ करमणुकीची साधने नसून समाज घडवणारी प्रभावी माध्यमे असल्याचे सांगत त्यांनी कला ही साध्य नसून साधन आहे असेही स्पष्ट केले.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे कला दिग्दर्शक मंदार पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित मार्गदर्शकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे नाट्यकर्मी राजेंद्र कदम यांनी कथामाला कार्यशाळेतील अनुभव सांगत सिनेमा, कथा आणि कीर्तन यांचा संगम प्रभावी असल्याची प्रतिक्रिया मनोगताद्वारे व्यक्त केली.
मान्यवर अतिथी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी सध्याच्या तरुणांमध्ये दिशेचा अभाव जाणवतो अशी खंत व्यक्त केली. अशा कार्यशाळा त्यांना मार्गदर्शन करून आत्मविश्वास वाढवतात तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांची विशेष गरज असल्याचेही प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांनी विशेष नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांनी, बॅरिस्टर नाथ पै यांच्या कलाप्रेमाची आठवण करून देत त्यांनी स्थानिक दशावतारी कलेला दिलेले प्रोत्साहन विशेष अधोरेखित केले.
सानेगुरुजी वाचन मंदिर वाचनालयाच्या प्रमुख ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमात मंचावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर, सानेगुरुजी वाचन मंदिर लिपीक गौरी केळुसकर तसेच वेंगुर्लेकर, शिबिरार्थी व सेवांगण व्यवस्थापन, कर्मचारी उपस्थित होते.
कलाप्रेमी बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि ‘सिने कथा कीर्तन’ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या ह्या कार्यशाळेतून तरुणांनी केवळ चमकण्यासाठी नव्हे, तर सातत्य, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवावे हा संदेश देण्यात आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यशाळेतील सहभागींनी त्यांचे मनोगताद्वारे अनुभव कथन करत कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.