योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्ती बद्दल विशेष सत्कार.
योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्ती बद्दल विशेष सत्कार.
काझी शहाबुद्दीन हाॅल, सावंतवाडी येथे हिरकणी योग केंद्राच्या वतीने आयोजित समारंभात योगसाधक, प्रशिक्षक आणि नागरिकांची उपस्थिती.
उत्तर प्रदेशच्या 'व्हिजन वेलनेस फाऊंडेशन' द्वारा शेखर बांदेकर यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : योग क्षेत्रातील योगदान व सेवेबद्दल, योग शिक्षक श्री शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ प्रदान नुकताच करण्यात आला, या राष्ट्रीय सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील 'हिरकणी योग केंद्र' च्या वतीने 'काझी शहाबुद्दीन हाॅल' येथे त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन शेखर बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. योगसाधक, प्रशिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांदेकर यांनी सावंतवाडी, बांदा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत योगवर्गांच्या माध्यमातून नागरिकांना योगसाधनेचे मार्गदर्शन केले असून आरोग्य जागृतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत व्हिजन वेलनेस फाउंडेशन (उत्तर प्रदेश) यांच्या वतीने त्यांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना शेखर बांदेकर यांनी योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. हिरकणी योग केंद्राच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)