ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
उद्योजक व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना असगणी येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

उद्योजक व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना असगणी येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान.

उद्योजक व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना असगणी येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान. 

Article image

Article image


श्री. हनुमान मंदिर मित्रमंडळ, असगणी यांच्या वतीने समाजसेवक वैद्यश्री गोविंद सोनु उर्फ नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ विशेष सन्मान. 

Article image


सतिश तांबे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान. 


मालवण : सुप्रसिद्ध उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना, मालवण तालुक्यातील असगणी, हळदीची वाडी येथे, २ एप्रिल २०२६ रोजी समाज भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. हळदीची वाडी येथील श्री. हनुमान मंदिरचे संस्थापक समाजसेवक कै. वैद्यश्री गोविंद सोनु उर्फ नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ असलेला हा पुरस्कार, कार्यकारी मंडळ अध्यक्ष व माजी न्याय दंडाधिकारी ॲड. सदानंद चव्हाण व व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.


श्री. सतिश तांबे यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


श्री. हनुमान मंदिर, हळदीची वाडी येथील प्रांगणात आयोजित ह्या विशेष पुरस्कार सोहळ्यात मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी विशेष न्याय दंडाधिकारी ॲड. सदानंद चव्हाण तसेच पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, सरपंच साक्षी चव्हाण, पंचायत समिती सदस्य दीपक बंडू चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाकरे, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, आजी - माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Article image


श्री देव हनुमान मंदिर येथे दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. सूत्रसंचालक वैभव पारकर यांनी प्रास्ताविक करत 'पुरस्कार सन्मानमूर्ती उद्योजक दत्ता सामंत व श्री सतिश तांबे यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित सर्वांचे स्वागत केले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सदिच्छा स्वागत करण्यात आले. 

Article image


Article image


Article image


Article image

श्री. हनुमान मंदिर मित्रमंडळ यांच्या वतीने, उद्योजक व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, कर्तुत्व व पितृत्व अशा पंचरंगी संगम असलेल्या अष्टपैलू व विविधांगी नेतृत्वाबद्दल त्यांना सन्मानित केले जात आहे असे कार्यकारी मंडळ अध्यक्ष व माजी विशेष न्याय दंडाधिकारी ॲड. सदानंद चव्हाण यांनी मंडळाच्या वतीने सांगितले. 

Article image


ज्येष्ठ समाजसेवक गजानन बाक्रे यांनी पुरस्कार सन्मान मूर्ती दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाच्या पैलू सोबत त्यांची खासदार नारायणराव राणे यांच्याप्रती असलेली 'दास्यभक्ती' ही पथदर्शी आहे असे सांगितले. श्री. देव हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती दिवशी होत असलेला हा 'दास्यभक्तीतील संयमाचा' विशेष सन्मान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवर आणि सर्वांच्या वतीने श्री. दत्ता सामंत यांना पुढिल निरामय वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. 


जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री. सतिश तांबे यांच्या सेवापूर्ण जीवन कारकिर्दिची मान्यवरांच्यावतीने प्रशंसा करण्यात आली. 

Article image


पुरस्कार सन्मानाला उत्तर देताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. श्री. दत्ता सामंत यांनी असगणी गावाशी त्यांचे दोन दशकांपेक्षा जास्त काळचे नाते विशेष अधोरेखित केले. राजकारण किंवा समाजकारण करताना 'लोकहिताचा' शुद्ध हेतू राखणे आवश्यक असते आणि अशा पुरस्कारांमुळे आपल्या उद्देशांचे सदैव स्मरण रहाते असे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या उद्देशासाठी लोकांचे काम करताना मिळणारा आनंद हा इतर सर्व आनंदांसमोर खूप मोठा आहे असे सांगत त्यांनी खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लोकहीताला आपले व सहकारी वर्गाचे प्राधान्य असेल असेही त्यांनी प्रतिपादन केले.

Article image

Article image


जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी श्री सतिश तांबे यांनी जीवन गौरवानंतर कार्यरत रहायची इच्छा वाढल्याचे सांगत आयोजकांचे आभार मानले.


पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, सरपंच साक्षी चव्हाण, तालुकाप्रमुख विनायक बाईत व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Article image


यावेळी विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तिंचा सदिच्छा सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमाला उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, ॲड. सदानंद चव्हाण, विनायक बाईत, गजानन बाक्रे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. घाडीगावकर, संग्राम साळसकर, यांच्यासह श्री. हनुमान मंदिर, असगणी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, दीपक बंडू चव्हाण, दुलाजी परब, शानू वालावलकर, श्री. बिरमोळे तसेच वैद्यश्री गोविंद उर्फ नाना चव्हाण कुटुंबिय, महादेव चव्हाण, दीपक चव्हाण, पोलिस पाटील श्री. जिकमडे यांच्यासह श्री. हनुमान मंदिर मित्रमंडळ, हळदीची वाडी, असगणीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.



श्री. वैभव पारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आयोजकांकडून, पुरस्कारमूर्ती, मान्यवर व सोहळ्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स