डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांना एमबीबीएस पदवी प्रदान.
डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांना एमबीबीएस पदवी प्रदान.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चौके येथील डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांना एमबीबीएस पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. जाई यांचे शिक्षण रोझरी इंग्लिश स्कूल मालवण येथे झाले.
डाॅ. जाई पोळ यांनी, 'शाहू कॉलेज, लातूर' येथे 'नीट प्रशिक्षण' घेऊन एमबीबीएसचे शिक्षण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर येथे पूर्ण केले.
डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांनी एमबीबीएस पदवी शिक्षण पूर्ण केले. नुकताच त्यांचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला.
डाॅ. जाई पोळ ह्या ग्रामीण रुग्णालय मालवण, पेंडूर कट्टा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डाॅ. संजय पोळ व चौके येथे वैद्यकीय सेवाव्रती डॉ. स्मिता संजय पोळ यांची कन्या आहेत.
डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.