मालवण एस. टी. आगाराचे वरीष्ठ लिपीक विनोद शंकरदास यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा.
मालवण एस. टी. आगाराचे वरीष्ठ लिपीक विनोद शंकरदास यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी व मान्यवरांकडून विनोद शंकरदास यांच्या ३४ वर्षांच्या सेवेची विशेष प्रशंसा.
मालवण | प्रतिनिधी : मालवण एस टी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एस टी आगारचे वरीष्ठ लिपीक विनोद शंकरदास यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. ३१ मार्च २०२६ रोजी, मालवण एस. टी. महामंडळ आगारच्या सभागृहात आयोजित ह्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात व्यासपिठावर अध्यक्ष म्हणून मालवण एसटी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक अधिक्षक स्वप्निल गडदे यांच्यासह सत्कारमूर्ती विनोद शंकरदास आणि विनोद शंकरदास यांच्या पत्नी सौ. वैशाली शंकरदास आदि मान्यवर उपस्थित होते. मालवण एस टी आगार परिवाराच्या वतीने आयोजित ह्या विशेष कार्यक्रमात एस टी च्या विविध विभागातील आजी - माजी कर्मचारी व अधिकारी, सामाजिक मान्यवर, उद्योजक, व्यापारी आणि विनोद शंकरदास कुटुंबिय आणि हितचिंतक उपस्थित होते.
एस. टी. आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या हस्ते व सहाय्यक वाहतूक अधिक्षक स्वप्निल गडदे यांच्या उपस्थितीत विनोद शंकरदास यांना त्यांच्या सेवेबद्दल विशेष स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या वतीने सौ. वैशाली विनोद शंकरदास यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी विशेष मनोगताद्वारे श्री. विनोद शंकरदास ह्यांच्या सेवाकालातील 'हरहुन्नरी कार्यशैली' ची प्रशंसा केली.
श्री. सूर्यवंशी यांनी श्री. शंकरदास यांची नोकरी सेवे दरम्यान कुठल्याही विभागात काम करायला सज्ज असलेली सहकार्याची वृत्ती आणि त्यांची तत्पर जीवनशैली ही अनेकांसाठी प्रोत्साहक असल्याचे सांगितले.
मालवण एस टी आगार, ज्येष्ठ नागरीक, लायन्स क्लब सदस्य, व्यापारी यांनी श्री. विनोद शंकरदास यांना सन्मानित करत सदिच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री. विनोद शंकरदास यांनी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, मान्यवर आणि मालवण एस टी आगार परिवाराचे आभार मानले.
श्री. विनोद शंकरदास म्हणाले, की त्यांना भांडार शाखा म्हणजे स्टोअर विभाग आणि देवगड, कणकवली आणि मालवण आगार अशा सेवेनंतर २०१६ साली वरीष्ठ लिपिक पदी कार्यरत व्हायचा मान मिळाला. यानंतर गेली १० वर्षे मालवण आगारात सेवेत रहायचं भाग्य लाभलं हे विशेष आहे. सगळेच जुने, नवे आणि समकालीन वरीष्ठ, अधिकारी व सहकारी सदैव महत्वाचे आहेत असेही श्री. शंकरदास यांनी सांगितले.
यावेळी श्री. शंकरदास यांनी दिवंगत मार्गदर्शक श्री. बोवलेकर, श्री. खरात व श्री. पोफळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
श्री. विनोद शंकरदास यांनी त्यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी सौ. वैशाली शंकरदास व मुलगा हेरंब शंकरदास यांची आश्वासक खंबीर साथ मोलाची ठरल्याचे सांगितले. उपस्थित सर्व मान्यवर, सहकारी आणि परिवार तसंच नातेवाईक, मित्र, हितचिंतक यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित शुभेच्छुक ज्येष्ठ नागरीक संघाचे डाॅ. सुभाष दिघे, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. कर्णिक, एल. आय. सी. चे निवृत्त अधिकारी श्रीधर काळे, लायन्स क्लबचे गणेश प्रभुलकर, विनोद शंकरदास यांचे महाविद्यालयीन वर्गमित्र सुरेश बापर्डेकर, सत्कारमूर्ती विनोद शंकरदास यांचे माजी वरीष्ठ सहकारी एस. एल. परब, नगरसेविका नीना मुंबरकर यांनी विनोद शंकरदास यांना पुढील सर्वांगीण वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. विनोद शंकरदास यांच्या पत्नी सौ. वैशाली विनोद शंकरदास आणि सुपुत्र कु. हेरंब विनोद शंकरदास यांनी कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण मनोगत व्यक्त करत श्री. विनोद शंकरदास यांच्या सेवाकाळात सहकार्य केलेल्यांचेही विशेष आभार मानले.
यावेळी मालवण एस टी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक अधिक्षक स्वप्निल गडदे आणि मालवण एस टी आगारचे अधिकारी, चालक , वाहक, कर्मचारी तसेच सौ. वैशाली शंकरदास, विनोद शंकरदास यांचे बंधू उद्योजक श्री. राजा शंकरदास, डाॅ. सुभाष दिघे, निवृत्त प्राचार्य जगदीश कर्णिक, श्रीधर काळे, सौ. जयश्री हडकर बाई, चाचा हडकर, उद्योजक महेश उर्फ बाळू अंधारी, उद्योजक गणेश कोळंबकर, उद्योजक रमण मसुरकर, सुनील चव्हाण, उद्योजक मुकेश बावकर, उद्योजक शांती पटेल, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित, उद्योजक तसेच वरची देवली सरपंच श्याम वाक्कर, उद्योजक राजेश वळंजू, डाॅ. ज्योती बुवा तोरसकर, एस. टी. महामंडळ माजी कर्मचारी शशी यादव, बाळकृष्ण सावंत व एस. एल. परब, ज्येष्ठ व्यापारी छोटू तारी, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोलसकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, उद्योजक सुधीर कांदळकर, नरसेविका नीना मुंबरकर, मनोज मोंडकर, राधिका मोंडकर, सौगंधराज बादेकर, अंकित शंकरदास, हेरंब शंकरदास तसेच एस टी परिवारातील दिलीप हिंदळेकर, संतोष पाटील, मालवण एस टी आगारचे आजी व माजी अधिकारी, कर्मचारी आणि विनोद शंकरदास हितचिंतक उपस्थित होते. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांनी श्री विनोद शंकरदास यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सदिच्छा दिल्या.
श्री. विनोद शंकरदास यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच त्यांच्या सेवेला समर्पित स्वरचित कविता रचनेचे वाचन केले. त्यांचे महाविद्यालयीन वर्गमित्र सुरेश बापर्डेकर यांनी महाविद्यालयीन समकालीन मित्राच्या वतीने पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले.
श्री. विनोद शंकरदास यांनी सहकारी दिलीप हिंदळेकर, चालक संतोष पाटील यांना भेटवस्तू देत त्यांच्या विद्यमान सेवेला प्रोत्साहक सदिच्छा दिल्या.
विनोद शंकरदास यांनी मालवण एस टी आगार परिवाराच्या विविध उपक्रमांना वक्त्यांसाठी उपयुक्त ठरेल असे 'पोडियम' भेट स्वरुपात दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. प्रसाद करंदीकर यांनी मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.
*************
( श्री. विनोद शंकरदास यांच्यासह एस टी चे आणखी एक कर्मचारी श्री. प्रमोद नारायण गोसावी यांना देखिल मालवण एस टी आगार परिवाराच्या वतीने ३३ वर्षांच्या सेवापूर्तीबद्दल गौरविण्यात आले आहे.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
'मजला ठाव द्यावा पायी....!'
साने गुरूजींच्या 'वारा वदे कानांमध्ये' सारख्या गीत रचना बालपिढीला अधिक समृद्ध, सुसंस्कृत व प्रेमळ करतील...!
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.