ताज्या बातम्या
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण शिबीर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण शिबीर संपन्न.

मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण शिबीर संपन्न. 

Article image

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसेच 'अधिक उपचार, कमी रेफरल' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.


प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे येथे आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. 


यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. योगेश साळे यांनी सांगितले की, सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक रेफरलचे प्रमाण कमी करून प्राथमिक स्तरावर अधिकाधिक उपचार देणे शक्य होणार आहे. डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच आरोग्यदायी व स्वच्छ परिसर निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.


या प्रशिक्षणासाठी तुळस येथील आरोग्य सेवक द्वारकानाथ बावडेकर, समुदाय आरोग्य अधिकारी सायली मानेचकर, माणगाव येथील आरोग्य सेविका सायली कन्याळकर, हिवाळे येथील आरोग्य सेविका संजीवनी कणेकर, मसुरे येथील आरोग्य सेविका आरती कामत तसेच सावंतवाडी तालुका समूह संघटक बिनिता दळवी आदी प्रशिक्षक उपस्थित होते.


या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, एएनएम, एमपीडब्ल्यू तसेच आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात शिशू व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे निदान, प्रतिबंध व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच आयुष उपचार पद्धतींचा प्रभावी वापर आदी विषयांचा समावेश होता.


यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स