ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
देवबाग समुद्रात एलईडी मासेमारी नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

देवबाग समुद्रात एलईडी मासेमारी नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई.

देवबाग समुद्रात एलईडी मासेमारी नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून उभ्या असलेल्या मासेमारी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ३० मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही नौका जप्त करण्यात आली असून, ही नौका सर्जेकोट मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे.


पालकमंत्री तसेच मत्स्योद्योग व बदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे कठोर धोरणात्मक दिशानिर्देश तसेच मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी, मालवण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही मोहीम राबवली. महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अंदाजे ११-१२ सागरी मैल अंतरावर ही नौका रत्नागिरी येथील मालकाची असून, अनधिकृत एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून उभी असलेली आढळली होती अशी माहिती मिळत आहे. 


नौकेवर तांडेलसह एकूण २ खलाशी होते. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर केला जाणार असून सुनावणीनंतर नौका मालक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.


या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर, सावजी यांचे सहकार्य लाभले. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स