ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मसुरे येथील सिंधू आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मसुरे येथील सिंधू आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मसुरे येथील सिंधू आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

Article image


मसुरे | प्रतिनिधी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे यांच्या वतीने सिंधू आरोग्य मेळावा मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, जि. प. सदस्य शमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यात २०५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. 


यावेळी बोलताना मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण म्हणाल्या की 

'सिंधू आरोग्य मेळावा' हा स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. 


यावेळी मसुरे जि. प. सदस्य क्षमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समिती सदस्या श्रीम. योजना कांबळी, संजय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील, डॉ. सायली मिठारी आणि मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आरोग्य मेळाव्याविषयी माहिती देऊन शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

विविध मान्यवरांनी या आरोग्य मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. 


सर्व रुग्णांची तपासणी डॉक्टर वसीम वल्लिकापट्टा, डॉक्टर ब्लेसी जोसेफ, डॉक्टर पूजा, डॉक्टर भावनेश चव्हाण, डॉक्टर अखिल बेगडे, डॉक्टर आर्या कदम, डॉक्टर कृष्णा त्यागी, डॉक्टर विणा मेहंदळे, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर प्रियांका पाटील यांनी केली. यामध्ये हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, नेत्ररोग, ईसीजी, वय वंदना, पी एम जे ए वाय कार्ड, एच एल एल टेस्ट, व्ही आय ए टेस्ट, एच पी व्ही लसीकरण, एन सी डी विभाग, जनरल फिजिशियन आदी विभागातील आरोग्यविषयक समस्या बाबत रुग्णांनी सहभाग नोंदवला. उपस्थित रुग्णांची तपासणी करून प्राथमिक स्वरूपातील औषधोपचार मोफत करण्यात आले.


यावेळी विनोद पारकर, एस. जे. कदम, सिद्धेश धुरी, दत्ता पिंगुळकर, कृष्णा माजिक, डॉक्टर प्रशांत पवार, भक्ती परब, अंजली नेरुळकर, प्राची परब, ईस्टर मोहिते, क्रांती तोरस्कर, प्राची पेडणेकर, वसुधा कदम, दिव्या पांजरी, संगीता सामंत, वारीजा हडकर, संगीता मयेकर, सायली पाटील, सौम्या बांदेकर, प्रथमेश वायंगणकर, क्रांती पारकर, रामचंद्र जोशी, नितीन घाडी, राकेश चव्हाण, पल्लवी नाचणकर आणि मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज बांगर यांनी केले.

विनोद पारकर व शंकर कदम यांनी आभार प्रदर्शन केले. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स