ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

Article image

सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने आयोजित उपक्रम. 


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा, नुकतीच संपन्न झाली. यावेळी प्रशिक्षक अंकुश जोगदंडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षा कायद्याबाबत जाणीव जागृती आणि खाद्यपदार्थ उत्पादन व निर्मितीमध्ये पाळायाचे नियम, घ्यायची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस मालवण तालुक्यासह जिल्हाभरातील सुमारे ८५० अन्नसुरक्षा परवानाधारक व कर्मचारी यांनी उपस्थित राहून लाभ घेतला.


या कार्यशाळेत जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी प्रास्ताविक करत अन्नसुरक्षा प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. यावेळी मार्गदर्शक अधिकारी करण गावित, अभय चंदनशिवे आणि प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांचे मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर व मालवण शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


यावेळी प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांनी अन्नसुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. खाद्य व अन्न यांचे उत्पादन तसेच त्यांची विक्री, साठवणूक आणि वितरण करण्याच्या व्यवसायात असणाऱ्यांना केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा नियमावलीनुसार अन्नसुरक्षा परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्न व खाद्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यक्तींनी प्रथम स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. तसेच खाद्यपदार्थ उत्पादन ज्या जागेत केले जाते ती जागा सुरक्षित, बंदिस्त व स्वच्छ ठेवावी. तसेच खाद्यपदार्थ पॅकिंग व वितरणाची जागा देखील सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ उत्पादनामध्ये काम करणाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात धुतले पाहिजे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे प्रमाणित असावे असे सांगितले.


त्याचप्रमाणे शासनाच्या अन्नसुरक्षा कायदा बाबत प्रत्येकामध्ये जाणीव जागृती असणे महत्त्वाचे असून कायद्यातील तरतुदींचे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नियमांचा भंग केल्यास दंड व इतर कारवाई होऊ शकते, असे मार्गदर्शन यावेळी अधिकाऱ्यांनी करत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले तसेच इतर कोणाच्या शंका असतील तर थेट अन्नसुरक्षा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकारी करण गावित आणि अभय चंदनशिवे यांनी केले. अभय कदम यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स