सावंतवाडीत 'अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना' राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक.
सावंतवाडीत 'अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना' राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने व नवनियुक्त पदाधिकारी सन्मानित.
४ मे २०२६ रोजी गोवा येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : डिजिटल पत्रकारितेच्या विश्वातील अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन ४ मे २०२६ रोजी गोवा राज्यातील पणजी येथील कला अकादमी येथे आयोजित करण्यात आले असल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडीत केली. यावेळी संघटनेच्या वतीने राजा माने यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने विशेष अभिनंदनपर स्वागत करण्यात आले.
अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतून पत्रकार, संपादक आणि डिजिटल माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, तालुका संघटक आनंद धोंड तसेच पदाधिकारी शुभम सावंत, श्रीरंग सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राजा माने, तेजस राऊत व सीताराम गावडे यांनी उपस्थितांना पत्रकारिता, सद्य स्थिती याबाबत मार्गदर्शनपर संबोधित केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी राजा माने व तेजस राऊत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या वतीने नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी सिताराम गावडे, रुपेश पाटील, राजेश नाईक, भरत केसरकर, सिद्धेश सावंत व आनंद धोंड यांचा गौरव करण्यात आला.
राजेश नाईक, भरत केसरकर, सिद्धेश सावंत व आनंद धोंड यांनी त्यांच्या मनोगताद्वारे संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला.
सागर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले आणि गत अधिवेशनांचा आढावा घेतला. प्रा. रुपेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी' सत्कार.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वा...
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.