ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आमदार निलेश राणे यांची सिंधुदुर्गातील मच्छीमार बांधवांनी घेतली भेट.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांची सिंधुदुर्गातील मच्छीमार बांधवांनी घेतली भेट.

आमदार निलेश राणे यांची सिंधुदुर्गातील मच्छीमार बांधवांनी घेतली भेट. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी भेट घेऊन विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दर वाढीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनमार्फत आमदार निलेश राणे यांना निवेदन देण्यात आले. याबाबतचा पाठपुरावा शासन स्तरावर करत असून मंत्री नितेश राणे यांनी केंद्र शासनाला याबाबत पत्र पाठवले आहे. मच्छीमारांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपस्थित होते.


मच्छिमारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मच्छीमार सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या डिझेलचे 'बल्क सेल' वर्गीकरण तात्काळ रद्द करून ते रिटेल' अथवा सवलतीच्या दरात समाविष्ट करण्यात यावे. मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणारा डिझेल प्रतिपूर्ती दर वाढवून मिळावा. त्यासोबत डिझेल परतावा/प्रतिपूर्ती दर त्रैमासिक नियमितपणे वितरित करण्यात यावा. 'बल्क सेल' वर्गीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.


मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत मच्छीमारांच्या दृष्टीने अधिक योजना समाविष्ट कराव्यात. मालवण येथे सुसज्ज जेटीची उभारणी व्हावी. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. याबाबतही माझे व मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच जेटी उभारणीचा शुभारंभ होईल. आम्ही मच्छीमारांच्या सोबत ठामपणे असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगत मच्छीमारांना आश्वस्त केले.


सद्यस्थितीत कॅन अथवा बॅरल मधून डिझेल, पेट्रोल वितरण पेट्रोल पंपावर केले जात नाही. याचा फटका मच्छीमार बांधवांना बसत आहे. याबाबतही मच्छीमारांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. याबाबत मच्छिमार बांधवानी समाधान व्यक्त केले, अशी माहिती मिळत आहे.


यावेळी ज्येष्ठ मच्छिमार तथा ज्येष्ठ मत्स्य उद्योजक श्री. गोपीनाथ तांडेल व मान्यवर, मच्छिमार बांधव उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स