ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
जिल्हा प्रशासनाचे व्यावसायिक एलपीजी वाटपाबाबत ग्राहकांना 'आवश्यक' अर्जाचे आवाहन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हा प्रशासनाचे व्यावसायिक एलपीजी वाटपाबाबत ग्राहकांना 'आवश्यक' अर्जाचे आवाहन.

जिल्हा प्रशासनाचे व्यावसायिक एलपीजी वाटपाबाबत ग्राहकांना 'आवश्यक' अर्जाचे आवाहन.


पत्ता, संपर्क क्रमांक व इमेल यांची माहिती.



सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial ) ग्राहकांना व्यावसायिक एलपीजीच्या एकूण ५०% वाटपातून पात्र होण्‍यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या City Gas Distribution (CGD) संस्थेकडे Piped Natural Gas (PNG)( पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणीसाठी अर्ज करण्‍यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या २७ मार्च २०२६च्या पत्रान्वये सुचवले आहे. त्‍याकरिता ग्राहकांनी खालील दिलेल्‍या नंबरवर अथवा कंपनीकडे संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.


पत्ता : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, श्री साईकला, हाऊस नं. ३१९२, नक्षत्र नगरीसमोर, सांगिर्डेवाडी, कुडाळ, ता : कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, पिनकोड 416 520.


संपर्क क्रमांक : 7588090505/ 9890743547

Email- crmsindhudurg@mngl.in


         

जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी वरील दिलेल्‍या पत्‍त्‍यावर PNG जोडणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासन सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स