'१० वी नंतर काय' विषयावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २९ मार्च रोजी करीअर समुपदेशन सत्र.
'१० वी नंतर काय' विषयावर
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २९ मार्च रोजी करीअर समुपदेशन सत्र.
नेहा करंदीकर - हुनारी यांचं मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने '१०वी नंतर काय', या करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ मार्च रोजी दादा शिखरे सभागृह, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी हे समुपदेशन सत्र संपन्न होणार आहे.
या सत्रात सर्टिफाईड करिअर समुपदेशक नेहा करंदीकर - हुनारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या समुपदेशनात सहभागी होण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर (९४२२९४६२१२) व व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर (९४२१५६९७०४) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, श्री. किशोर शिरोडकर, श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व श्री. शैलेश खांडाळेकर यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातं...
श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांना १०७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन.
श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. ड...
साने गुरूजींच्या 'वारा वदे कानांमध्ये' सारख्या गीत रचना बालपिढीला अधिक समृद्ध, सुसंस्कृत व प्रेमळ करतील...!