माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे २५ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे २५ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाची आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांची माहिती.
ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या २६ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त, बुधवार, २५ मार्च रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिंदर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बारापाच मानकऱ्यांचा सत्कार समारंभ, संध्याकाळी ८ वाजता आचरा विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, रात्री ८:३० वाजता माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस समारंभ असे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह असल्याची माहिती आचरा विभागातील प्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे.
चिंदर सातेरी मंदिर नजीक रात्री ९ वाजता चिंदर ग्रामपंचायत सदस्य केदार (पप्पू) परुळेकर पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा आबा कलिंगण लिखित 'रक्त स्कंदेश्वरी महिमा' हा महापौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. यामध्ये आबा कलिंगण, भाई कलिंगण, योगेश कोंडूरकर, उदय मोर्ये, राजू केरवडेकर, दत्तप्रसाद तवटे, यतीन वारंग, पवन वालावलकर, तात्या वारंग, ओम कलिंगण, राजेश कलिंगण, चंद्रकांत गावडे या कलाकारांचा सहभाग असून त्यांना निखील जोशी (हार्मोनियम), श्रीराज मोरजकर (मृदुंगमणी), संदेश परब (ताल रक्षक) यांची साथ लाभणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप