ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर देवस्थान बाबत दिडशे वर्षांनी एकोप्याचा निर्णय.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर देवस्थान बाबत दिडशे वर्षांनी एकोप्याचा निर्णय.

प्रकाशन: 25 Mar 2026 06:40 PM
वाचन संख्या 275

नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर देवस्थान बाबत दिडशे वर्षांनी एकोप्याचा निर्णय.

Article image


मानकरी, वकलदार व ग्रामस्थ यांच्या वतीने ऐतिहासिक 'आनंदाचा दिवस' असल्याची माहिती. 


सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण यांची गावाने 'वेगळा आदर्श' ठेवल्याची विशेष प्रतिक्रिया. 



मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील प्राचीन देवस्थान नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर देवस्थान बाबत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. मानकरी चव्हाण वकलांचा दिडशे वर्षांनी ( १५० वर्षे) एकोपा झाला आहे. यापुढे मंदिरातील सर्व कार्यक्रम एकत्र साजरे होणार असून हा खूप आंनदाचा हा दिवस आहे अशी माहिती मानकरी, वकलदार व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आली आहे.


समस्थ नांदरुख कातवड, कर्लाचाव्हाळ येथील श्री देव गिरोबा देवस्थांनचे मानकरी, वकलदार व सर्व ग्रामस्थ यांची सभा गिरोबा मंदिरात संपन्न झाली. गाव एकोपा होण्यासाठी झालेला अंतिम निर्णय सर्वांपर्यंत पोहचवीण्या विषयी श्री देव गिरोबा मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली. 


साळकुंभा, घरटंणवाडी, पलीकडची वाडी, कातवड, पटेलवाडी, नांदरुख ग्रामस्थ यांच्या उपस्थितील या सभेत काशिनाथ चव्हाण, गोविंद चव्हाण, आत्माराम चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, सुधीर चव्हाण, यशवंत चव्हाण, सिताराम गावडे, गुरुनाथ चव्हाण, रमेश चव्हाण, विष्णू चव्हाण, विजय वस्त, महादेव चव्हाण, जयद्र चव्हाण, संतोष चव्हाण, धनंजय चव्हाण, सुरेश परब, स्वप्नील साळकर, विलास गावडे, संजय नाईक, सुनील चव्हाण, संदेश चव्हाण, हरिश्चंद्र लाड, प्रसाद लाड, शिवराम चव्हाण, विजय हळदणकर, गणेश चव्हाण, अनुप घाडी, यशवंत धोंडी चव्हाण, सुनील चव्हाण, संगम चव्हाण, समीर चव्हाण, सुभाष लाड, सिद्देश साळकर, शिवराम सु. चव्हाण, यशवंत लाड, दशरथ पोखरणकर, राहुल चव्हाण, गणेश चव्हाण, मंगेश घाडी, विनीत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, शांताराम पाताडे, स्वप्नील चव्हाण, प्रशांत चव्हाण, संतोष चव्हाण, महेश नाईक, उद्धव चव्हाण, सुभाष चव्हाण, रामचंद्र चव्हाण, संतोष चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, दिगंबर चव्हाण, विजय चव्हाण, कमलेश चव्हाण, शशिकांत पारधी, सदगुरु नामनाईक, हेमंत मेस्त्री, श्रीकांत चव्हाण, किशोर चव्हाण, राजेश घाडी यांसह अन्य उपस्थित होते.


बैठकी नंतर मानकरी धनंजय अनंत चव्हाण, रमेश पोमजी चव्हाण, सुनील परशुराम चव्हाण, समीर अर्जुन चव्हाण यांसह सरपंच रामचंद्र (भाऊ ) गोविंद चव्हाण यांनी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया दिली असून आनंद व्यक्त केला आहे. 


​देव गिरोबा मंदिर १६ व्या शतकातील अतिशय प्राचीन मंदिर असून याचा परिसर शिवकालीन असल्यामुळे अतिशय सुंदर आहे.

​१८७७ पासून काही अंतर्गत कारणांमुळे या मंदिराचा कारभार मंदावला होता. गावामध्ये एकी राहावी या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामस्थांशी चर्चा केली. आता गावकरी, तीनही वकली आणि तरुण पिढी एकत्र येऊन गावच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी काम करणार आहेत. आमचा हाच संकल्प आहे की सर्वांच्या मदतीने आणि ईश्वराच्या कृपेने पुढील ५ वर्षांत या ठिकाणी एक भव्य मंदिर उभे राहील. असे धंनजय चव्हाण यांनी सांगितले. 


दोन पावले मागे येऊन आम्ही हे आता पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतोय त्यात 'गिरोबाने आम्हाला यश देणार,' असे रमेश चव्हाण यांनी सांगत आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.


एकोप्याने वाद मिटवला आहे. देवस्थान चालू झाले आहे. आता सर्व मानकरी यांना घेऊन आम्ही देवस्थानचे कार्य आनंदाने सुरू करणार आहोत. असे सुनील चव्हाण यांनी सांगितले.


सर्वांच्या एकोप्याने आणि सर्वांच्या सहभागाने हे होत आहे. हे सर्व पार पाडण्यासाठी आमचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा यांनी आम्हाला बळ दिले आणि त्याच्यामुळेच आम्ही हे सर्व काही करू शकलो. आजच्या या गौरवशाली आणि वैभवशाली दिवसाच्या निमित्ताने सर्व नांदुरुख वासियांना शुभेच्छा आणि धन्यवाद. असे समीर चव्हाण यांनी सांगितले.


नांदरुख गावाला सोन्याचे दिवस यायची सुरुवात सर्वांच्या सहकार्यातून होणार आहे. या सुवर्ण काळामध्ये सरपंच पद भूषविताना मला खूप अभिमान वाटतो. गावातील आमच्या ग्रामस्थ आणि आमच्या चव्हाण वकलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक आहे. अनेक ठिकाणी मानापमान वादविवाद होत असताना कोर्ट कचेऱ्या होत आहेत, त्यापेक्षा असा वेगळा एक आदर्श आज आमच्या गावाने सर्व लोकांसमोर ठेवलेला आहे. आज आपण हिंदू म्हणून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येऊन मंदिरामध्ये एकोप्याने सर्व नांदलं पाहिजे. गिरोबा देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही एक कुटुंबासारखे गुण्यागोविंदाने राहणार. अशी सर्वांनी गिरोबा चरणी शपथ घेतलेली आहे. त्याप्रमाणे हे अखंड चालवतील. खूप अभिमानाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे. असेच हे दिवस राहोत आणि हे असंच निरंतर राहो. ही गिरोबा चरणी प्रार्थना करतो असे सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण यांनी सांगितले.




छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. नांदरुख नावाच्या वृक्षापासून या गावाला नांदरुख हे नाव मिळाले. फार पूर्वी या गावाचा विस्तार मालवण, देवबाग इथपर्यंत होता. मालवण शहर हे नांदरुख गावची वाडी होती. नांदरुख ही त्याकाळी मोठी बाजारपेठ ही होती. 

आजूबाजूच्या परिसरात मोगल साम्राज्य, पोर्तुगीज आपले वर्चस्व प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लढा देत किल्ले सिंधुदुर्ग ची स्थापना केली. त्यावेळी नांदरुख गावातूनच कामकाज चालत असल्याचे बोलले जाते. दरम्यानच्या काळात गावाची विभागणी झाली अनेक महसूल गावे निर्माण झाली. मात्र ग्रामदैवत गिरोबा यांचे स्थान प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिले. अनेक भाविक देव गिरोबाच्या दर्शनाला येत असतात. नांदरुख गावच्या देव गिरोबा ची महती फार मोठी आहे असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स