दांडी किनाऱ्यावरील बंधाऱ्याबाबत हेमंत मोंडकर यांचे उपोषण.
दांडी किनाऱ्यावरील बंधाऱ्याबाबत हेमंत मोंडकर यांचे उपोषण.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांच्यासह उमेश मांजरेकर, रश्मीन उर्फ राका रोगे, अन्वय प्रभू, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती.
पतन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपोषणस्थळी भेट आणि चर्चा.
मालवण | ब्यूरो न्यूज : दांडी किनाऱ्यावरील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर या बंधाऱ्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील तसेच प्रथम टप्प्यातील बंधाऱ्याच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली गेली असतानाही राज्यातील सत्तांतरानंतर दोन वर्षे होऊन देखील सत्ताधाऱ्यांकडून या बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण ञउपशहरप्रमुख हेमंत मोंडकर यांनी दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरालगत किनाऱ्यावर आमरण उपोषण सुरु केले.
बंधाऱ्याच्या कामाबाबत ठोस असे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहिल, असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.
उबाठा शिवसेनेचे उपशहरप्रमुख यांनी सोमवार, २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण छेडले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, भाई ढोके, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, निलेश दुधवडकर, सुजन सागवेकर, आऊ मोंडकर, दाजी रोगे, माधुरी प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.
या बंधाऱ्यातील पुढील दहा कोटीच्या बंधाऱ्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळालेली नाही, ती परवानगी मिळवून देण्यासाठी देखील सरकारच्या येथील प्रतिनिधीकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिल्या टप्प्यातील दिड कोटीच्या बंधाऱ्याचे काम निधी मंजूर असून तसेच वर्क ऑर्डर असून सुरु का झाले नाही असा प्रश्न मांडत येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठीच हेमंत मोंडकर यांनी उपोषण छेडले आहे. जोपर्यंत या बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तसेच बंदराच्या कामाबाबत थेटपणे ठोस असे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हेमंत मोंडकर यांचे उपोषण सुरुच राहील, असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.