माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद पार्किंग, भरड येथे 'रोंबाट उत्सव' कार्यक्रम.
माजी आमदार आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद पार्किंग, भरड येथे 'रोंबाट उत्सव' कार्यक्रम.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती आणि उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने मालवणमध्ये नगरपरिषद पार्किंग, भरड येथे बुधवारी २५ मार्च २०२६ नेरूर येथील 'रोंबाट उत्सव' कार्यक्रम संपन्न होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या उपस्थित राहतील असे सांगितले आहे. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी उपक्रम व कार्यक्रम याबद्दलही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माहिती दिली.
या अभिष्टचिंतन सोहळ्यात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणवासिय, माजी आमदार वैभव नाईक यांचे हीतचिंतक, सर्व शिवसैनिक यांना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, नंदू गवंडी, दत्ता पोईपकर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...