जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी मालवण पंचायत समितीतील योजनांचा घेतला आढावा.
जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी मालवण पंचायत समितीतील योजनांचा घेतला आढावा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन, पंचायत समितीच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सभागृहात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आमदार निलेश राणे अधिवेशनात जनहिताचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यांच्या मतदार संघातील मालवण पंचायत समिती राज्यात आदर्श ठरली पाहिजे असे काम सर्वांनी करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी केले.
यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, दीपक सुर्वे, माधुरी मसुरकर यांसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत स्थानिक विकास कार्यक्रम, आमदार, खासदार निधी अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रगती तपासण्यात आली. जनसुविधा व नागरी सुविधा योजना २०२४-२५ अंतर्गत मूलभूत सुविधांची उपलब्धता, कामांची गुणवत्ता व वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्यात आला. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा आढावा घेऊन लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचत असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच भजन साहित्य व इतर वैयक्तिक लाभ योजनांच्या पारदर्शक अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच शाळा दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावणे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढवून प्रत्येक गावात नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करत शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे व वेळेत पोहोचवाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
जिल्हा परिषद विश्रामगृह, मालवण तसेच गटविकास अधिकारी कॉटर्सची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. पाहणी दरम्यान इमारतींची एकूण स्थिती, स्वच्छता, पाणी व वीज पुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व देखभाल कामे तात्काळ हाती घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. शासकीय विश्रामगृह व निवासस्थाने सुस्थितीत राहून अधिकारी व नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियमित देखभाल व सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.