ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
श्री देवी केळबाईचा २४ मार्च ते २६ मार्च कालावधीत जत्रोत्सव.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

श्री देवी केळबाईचा २४ मार्च ते २६ मार्च कालावधीत जत्रोत्सव.

प्रकाशन: 23 Mar 2026 09:21 PM
वाचन संख्या 72

श्री देवी केळबाईचा २४ मार्च ते २६ मार्च कालावधीत जत्रोत्सव.

Article image

२५ मार्च रोजी मालवण नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा, नूतन नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार कार्यक्रम.  


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण वायरी येथील कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार, २४ मार्च ते गुरुवार, २६ मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


मंगळवार, २४ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत आई केळबाई देवीचे नामस्मरण, १० ते दुपारी १२ या वेळेत दुर्गा सप्तशती पाठवाचन, सायंकाळी ५ वाजता महिला भजन, रात्री ९:३० वाजता आई पावणाईदेवी समई नृत्य मंडळ, किंजवडे परबवाडी, देवगड यांचा समई नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.


बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समुद्र स्नानाकरिता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता श्री केळबाई देवीला कलशस्नान व पूजा, १२:३० वाजता श्री केळबाई देवीला सामूहिक अभिषेक, दुपारी २ वाजता चैत्र शुद्ध सप्तमी महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत वैद्यकीय शिबीर, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ वाजता आई केळबाईची आरती संपन्न होणार आहे. 


२५ मार्च रोजी रात्री ९:३० वाजता मालवण नगरपरिषद नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार संपन्न होणारआहे. 


रात्री१०:३० वाजता स्थानिक कलाकारांचे करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. 


गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता श्री मूर्तीवर पंचामृत अभिषेक व स्नान, ९ वाजता श्री केळबाई देवीला सामूहिक अभिषेक, ११ वाजता होम हवन, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता चैत्र शुद्ध अष्टमी महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आरोग्य तपासणी शिबीर, सायंकाळी ७ वाजता स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता आई केळबाईची आरती, १० वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता दत्त माऊली दशावतार मंडळ, दाभोली वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक होणार आहे.


सर्वांनी या जत्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष बलवंत मयेकर, सरचिटणीस चंद्रकांत मयेकर, खजिनदार प्रमोद मयेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स