माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मांडकुली येथे उत्साहात साजरा.
माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मांडकुली येथे उत्साहात साजरा.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा मांडकुलीच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार.
तिरंगी डबलबारी भजन तसेच गावात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या डॉक्टर दामले, डॉक्टर ढवण, डॉक्टर नाईक यांचा सत्कार.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या डबलबारी सामन्याला वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मांडकुली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ यांनी वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, भजनी बुवांनी वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर गीत सादर करून संगीतमय शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गेली अनेक वर्षे मांडकुली गावात सेवा देणारे डॉक्टर दामले, डॉक्टर ढवण,डॉक्टर नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच तुषार सामंत,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, उपविभाग प्रमुख कपिल म्हापसेकर, युवासेना शाखा प्रमुख सिद्धेश धुरी, तातू मुळीक, अभिषेक मराठे, राजेश सावंत, धनवान खवणेकर, संतोष पेडणेकर, गौरव पेडणेकर, गोविंद अनसुरकर, चेतन मुळीक, सत्यवान मुळीक, महादेव मुळीक, शिवाजी मुळीक, संदीप नेमळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...
आंगणेवाडीत माजी आमदार वैभव नाईक यांचे सपत्निक श्री देवी भराडी मातेचे दर्शन.
आंगणेवाडीत माजी आमदार वैभव नाईक यांचे सपत्नि...
कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगारांच्या पगारा संदर्भात थेट संवाद.
कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगार...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.